ज्येष्ठ अर्थविश्लेषक शांताराम मंगेश गोठोस्कर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले . ते ७७ वर्षांचे होते . त्यांच्यापश्चात पत्नी अपर्णा , मुलगा भरत , मुलगी प्राजक्ता , सून , जावई असा परिवार आहे . दादर शिवाजी पार्कविद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने गोठोस्कर यांना मागील महिन्यात हॉस्पिटलमध्ये दाखलकरण्यात आले होते . गेली २५ दिवस ते कोमातच होते . चर्नी रोड येथील मोतीबेन हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधनझाले . सहकार क्षेत्रातील आघाडीच्या सारस्वत बँकेवर गोठोस्कर दोन वेळा निवडून आले होते . राज्य सरकारच्याराज्य वित्त महामंडळावर ते संचालक होते . सहकार , अर्थ तसेच अन्य विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले होते .
No comments:
Post a Comment