ज्येष्ठ पत्रकार व मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य शां. म. गोठोसकर यांचे आज सकाळी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून हृदयविकारामुळे त्यांच्यावर सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. गोठोसकर यांनी अनेक वृत्तपत्रांतून विविध विषयांवर लिखाण केले आहे. ]राजकीय व आर्थिक विश्लेषण या विषयांत त्यांचा हातखंडा होता. त्यांनी सारस्वत बँकेच्या संचालक मंडळावरही काही काळ काम केले होते. राजकीय, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील अभ्यासू, जाणकर पत्रकार हरपला आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Please click here to read this article on Lokmat Website
No comments:
Post a Comment