Showing posts with label Maharashtra Times. Show all posts
Showing posts with label Maharashtra Times. Show all posts

Saturday, November 17, 2012

शां. मं. गोठोस्कर

शांताराम मंगेश गोठोस्कर हे स्वतः प्रकट न होणारे पण प्रकाशात येणारी असंख्य माणसे घटना तर्क आणि युक्तिवादांमागची कर्तुम-अकर्तुम शक्ती असत. तसे ते मुळात पत्रकार. नवशक्ति या दैनिकात प्रदीर्घ कारकीर्द केलेले. पण ही त्यांची ओळख फारच अपुरी ठरेल. याचे कारण महाराष्ट्राचे राजकारण व त्याच्या अनुषंगाने येणारा सहकारक्षेत्राचा प्रचंड डोलारा समाजकारण आणि त्याला विळखा घालून बसलेली जातिव्यवस्था आधुनिक अर्थकारण आणि त्याच्या मांडीवरच जाऊन विसावलेला कॉर्पोरेट भ्रष्टाचार संस्कृतिकरण आणि त्यात घुसणारा प्रांतवाद तसेच जातिविचार... अशा साऱ्यांमध्ये गोठोस्करांना आमूलाग्र रस असे. शिवाय हा रस केवळ तत्त्ववैचारिक किंवा विद्यापीठीय नसे. ते स्वतः या घुसळणीतील खेळाडू होते. खरेतर या लालमातीत ताकदीने शड्डू ठोकणारे पैलवानच होते. पण त्यांचे प्रत्यक्ष रूप दर्शन आणि बोलणे याच्या विपरीत होते. सौम्य बोलणारे ,हलकेच हसून आपला मुद्दा पटविणारे महाराष्ट्रासंबंधीच्या असंख्य पण विश्वासार्ह नेमक्या आकडेवाऱ्यांनी दीपवून टाकणारे एखाद्याचा एखाद्या विषयात अधिकार आहे असे पटल्यास त्याला विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरून शंका विचारणारे... असे गोठोस्कर होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केवळ चालता-बोलता ज्ञानकोश नव्हे तर 'व्यवहारकोश हरपला आहे! गोठोस्करांनी असंख्य राजकीय नेते सहकारातील पुढारी अॅग्रो-उद्योजक पत्रकार-संपादक आणि कारखानदारांना व्यावहारिक सल्ले व धडे दिले. हे धडे देताना त्यांचे कायदे-नियमांचे ज्ञान ,अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचे भान सरकारी पातळीवरच्या घडामोडींची जाण आणि भविष्याचा वेध घेण्याची तहान हे सारे पणाला लागे. यामुळे ते कधी कोणत्या प्रकल्पावर काम करत असतील याचा नेम नसे. कधी ते मराठी- 'इटालियन उत्तम भाषांतर करणारा विश्वासाचा माणूस आहे का अशी विचारणा करीत तर कधी एखाद्या आडनावाचा कीस पाडून त्याची जात-पोटजात-प्रांत शोधून काढत. मतदारसंघांची फेररचना झाली तेव्हा गोठोस्करांनी दिलेले अहवाल केलेली कामे थक्क करणारी होती. एखाद्या तरुण पत्रकाराची त्यांच्याशी ओळख होणेयासारखा बोनस नसे. कारण एखादा विषय व बातमीकडे पाहण्याची नजरच ते बदलून टाकत. कितीतरी दुर्लक्षित आयाम सहज लक्षात आणून देत. ठोस बातम्यांचा त्यांच्याकडे इतका खजिना असे की ते बोलता बोलता अनेक बायलाइन्स देऊ शकत. गोठोस्करांसारखी चतुरस्र माणसे भारतासारख्या गुंतागुंतीच्या अवाढव्य लोकशाहीत वंगणासारखी असतात. अनेक संभाव्य कटकटी संघर्ष किंवा कटुता ते आपल्या बुद्धिचातुर्याने टाळतात.रिजिड सिस्टम मधून उत्तरे शोधून देतात. असे योगदान देणाऱ्यांकडे निर्मळ दृष्टीने पाहण्याइतकी आपली लोकशाही अजून प्रगत झालेली नाही. तशी ती होईल तेव्हा गोठोस्करांचे नाव पुन्हा एकदा आदराने स्मरावे लागेल.

Please click here to read this article on Maharashtra Times website.

Wednesday, November 14, 2012

शांताराम गोठोस्कर यांचे निधन


ज्येष्ठ अर्थविश्लेषक शांताराम मंगेश गोठोस्कर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते त्यांच्यापश्चात पत्नी अपर्णा मुलगा भरत मुलगी प्राजक्ता सून जावई असा परिवार आहे दादर शिवाजी पार्कविद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले 


मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने गोठोस्कर यांना मागील महिन्यात हॉस्पिटलमध्ये दाखलकरण्यात आले होते गेली २५ दिवस ते कोमातच होते चर्नी रोड येथील मोतीबेन हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधनझाले सहकार क्षेत्रातील आघाडीच्या सारस्वत बँकेवर गोठोस्कर दोन वेळा निवडून आले होते राज्य सरकारच्याराज्य वित्त महामंडळावर ते संचालक होते सहकार अर्थ तसेच अन्य विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले होते .

Tuesday, October 9, 2012

अजितदादांचे फसलेले बंड!


अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामामुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दिल्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचेमंत्री व काही आमदार यांनीही आपापल्या पदांचे राजीनामे त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सोपविले यामुळे फारमोठे वादळ निर्मण झाले या इतरांनी राजीनामे देण्याचे प्रयोजन काय ? ' टाइम्स ऑफ इंडिया तून अतिप्रचंडभ्रष्टाचार केल्याचा भडिमार सतत दोन दिवस झाल्याने अजितदादांनी राजीनामा दिला त्यांच्या या कथितभ्रष्टाचाराला राजीनामा दिलेल्या इतरांची साथ आहे असा याचा प्रत्यक्षात अर्थ होईल एवढे भानसुद्धा यामंडळींनी ठेवले नाही 

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगात राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे मंत्री व आमदारआपल्यासोबत आहेत हे दाखवून देणे अजितदादांना आवश्यक वाटले आणि त्यांनी हे सर्व घडवून आणले .अजितदादांना मुख्यमंत्री व्हायची महत्त्वाकांक्षा असून त्यासाठी आपली ताकद किती आहे हे त्या पक्षाचे प्रमुखअसलेल्या शरद पवार यांच्या ध्यानात आणून देण्यासाठी हा सारा खटाटोप करण्यात आला संधी येईल तेव्हाअजितदादांना मुख्यमंत्रीपद देण्यास पवार तयार नसल्याने हे शक्तिप्रदर्शन करण्यात आले माझ्या पाठीशी पक्षाचेसर्व आमदार आहेत मग मुख्यमंत्रीपदासाठी माझा दावा मान्य करता की नाही असाच सवाल त्यांनी शरद पवारयांना टाकला 

याला महत्त्वाची पार्श्वभूमी आहे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांचे पहिले संयुक्त सरकार १९९९ साली लोकशाहीआघाडी या नावाने अस्तित्वात आले त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार कमी असल्याने मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे गेले .पुढे २००४ साली राष्ट्रवादीचे आमदार जास्त झाल्याने त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार हे ओघाने आले पण हेपद काँग्रेसकडेच राहील असे शरद पवार यांनी जाहीर केले त्यापूर्वी त्यांच्याकडे अजितदादांनी आपल्या नावाचाआग्रह धरला होता आपणाला हे पद देण्यास शरद पवार तयार नाहीत हे अजितदादांच्या प्रथमच लक्षात आले 

अजितदादांच्या या महत्त्वाकांक्षेला खो घालण्यासाठी पवारांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना राजकारणातआणायचे ठरविले तेव्हा थोडेसे वादळ निर्माण झाले या संबंधात सुप्रिया मुख्यमंत्री होतील काय ?' हा प्रस्तुतलेखकाचा लेख ऑगस्ट २००६मध्ये प्रसिद्ध झाला होता शरद पवार यांचा राजकीय वारस कोण असा हा प्रश्ननसून राष्ट्रवादीकडे सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट पवार सुप्रियांच्या मस्तकी ठेवतील की पुतणे अजितपवार यांच्या असा हा खरा प्रश्न असायला हवा असे त्यावेळी म्हटले होते 

त्या काळात सुप्रिया राष्ट्रीय पातळीवर दिल्लीत काम करील आणि तू महाराष्ट्रात बघ असे धडेवाटप करून देण्यातआले त्यानंतर सुप्रियांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर मग राज्यसभेवर व नंतर लोकसभेवर निवडून आणलेगेले पुढे २००९ साली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर अजितदादांच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले नाही .मग २०१०च्या अखेरीला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होताना अजितदादांनी थोडेसे शक्तिप्रदर्शन करूनउपमुख्यमंत्रीपद मिळविले आता २०१४च्या निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादीला विधानसभेच्या जास्तीत जास्तजागा मिळवून देऊन मुख्यमंत्रीपदी आरूढ व्हावे अशी योजना अजितदादांनी आखली आहे त्यावेळी शरद पवारयांनी खोडा घालू नये त्यासाठी अजितदादांनी आताच शक्तिप्रदर्शन केले प्रत्यक्षात ते शरद पवारांविरुद्ध बंडच होते

शरद पवार यांच्या सांगण्यावरून आपण राजीनामा देत आहोत आणि पक्षाचे मंत्री व आमदार यांनी आपलेराजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे दिले पाहिजेत असा त्यांचा आदेश आहे असा आभास निर्माण करून हे बंड घडवूनआणले तो आभास खोटाच होता शरद पवारांचा असा आदेश नाही हे आधी समजले असते तर अन्य कोणीहीराजीनामे दिले नसते हे उघड आहे पवारांनी हे बंड नंतर मोडून काढले घरातल्या बंडोबाचा त्यांनी थंडोबा केलामहाराष्ट्रातील सारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या काखोटीला मारून नेण्याचा अजितदादांचा हा प्रयत्न पवारांनीसहजपणे हाणून पाडला 

आपल्या देशात पक्ष काखोटीला मारून नेण्याचे अनेक प्रयत्न झाले या देशात नोंदणी झालेले १२००हून अधिकपक्ष असले तरी राष्ट्रीय पातळीवरील सात व राज्य पातळीवरील ४३ असे निवडणूक आयोगाने मान्यता दिलेलेफक्त ५० पक्ष आहेत त्यांचाच इथे विचार करता येईल यांपैकी दोन कम्युनिस्ट पक्ष आणि पश्चिम बंगालमध्येमान्यता असलेले तीन डावे पक्ष वगळता बाकीचे सर्व ४५ पक्ष म्हणजे प्रत्यक्षात पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत .त्यापैकी भाजपचे कन्ट्रोलिंग शेअर्स आरएसएसच्या ताब्यात तर उर्वरित ४४ पक्षांचे शेअर्स एखादा नेता व त्याचेकुटुंबीय यांच्या ताब्यात आहेत काँग्रेसचे कन्ट्रोलिंग शेअर्स सोनिया गांधींच्या समाजवादी पक्षाचे मुलायमसिंगांच्या बहुजन समाज पक्षाचे मायावतींच्या तृणमूल काँग्रेसचे ममतांच्या एआयएडीएमकेचे जयललितांच्या ,डीएमकेचे करुणानिधींच्या व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या ताब्यात आहेत अकाली दल जेडीयू जेडीएस ,बीजेडी शिवसेना मनसे आदींची अशीच स्थिती आहे आरएसएससारखे या सर्वाचे एकचालकानुवर्तित्व असते .त्या एकचालकाला बाजूला सारून पक्ष आपल्या काखोटीला मारून नेण्याचे आपल्या देशात गेल्या ५० वर्षांत अनेकप्रयत्न झाले त्यामध्ये फक्त चंद्राबाबू नायडू यशस्वी झाले तेलुगू देशम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष एन टी .रामाराव यांना बगल देऊन चंद्राबाबूंनी तो पक्ष पळविला अशी करामत अजितदादांच्या कुवतीपलीकडची आहे 

लोकसभेच्या २०१४ सालच्या निवडणुकीनंतर आपले राष्ट्रीय पक्ष हे स्थान राष्ट्रवादी काँग्रेस गमावण्याचा बराचधोका आहे आपल्या पक्षाबाबत शरद पवारांना तीच चिंता लागून राहिली आहे अशा स्थितीत अजितदादानी बंडकरणे ही गोष्ट ते मुळीच सहन करणार नाहीत हे उघड आहे मराठा राजकारण व साखर कारखान्यांचे राजकारणयांच्या पलीकडे मुख्यमंत्रीपदाच्या राजकारणाच्या कक्षा बऱ्याच विस्तृत असतात याची अजितदादांनाजाणीवसुद्धा नाही सुप्रिया तर आपल्या राजकारणाबाबत किमान आवश्यक एवढ्याही गंभीर नाहीत त्यामुळेमुकुट डोक्यावर ठेवण्याचा प्रश्न बंडापेक्षा गंभीर बनला आहे 

शां म गोठोसकर


Please click here to read this article on Maharashtra Times website.